पवना धरणाच्या पाणी साठ्यात दुपटीने वाढ

0

मावळ : मावळ परिसरात पावसाने तुर्तास विश्रांती घेतली असली तरी पवना धरणात मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिली असली तरी जुलै महिन्यात अवघ्या आठ दिवसात पावसाने पूर्ण कसर भरून काढली आहे. त्यामुळे सध्या धरणातील पाणीसाठा हा 62.91 म्हणजे 63 टक्क्यांवर पोहचला आहे. मागीलवर्षी आजच्या दिवशी 35.59 टक्के एवढे पाणी होते.

मागील 24 तासात धरण परिसरात 50 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या पावसाचा जोर थोडा ओसरल्याने धरणातील येवा कमी झाला आहे. त्यामुळे शंभर टक्के धरण भरण्यासाठी नागरिकांना थोडी वाट बघावी लागणार आहे. तुर्तास धरणातील विसर्गही थांबवण्यात आला आहे. 1 जुनपासून आज पर्यंत घरण क्षेत्रातून 28.57 घन मिली मीटर इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

सध्या पवना धरणातील परिस्थिती!

गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 50 मि.मि.

1 जूनपासून झालेला पाऊस = 1, 373 मि.मि.

गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 604 मि.मि.

धरणातील सध्याचा पाणीसाठा = 62.91 टक्के”

गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 35.29 टक्के

गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ

= 3.5 टक्के

1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 46.07 टक्के

Leave A Reply

Your email address will not be published.