दारूसाठी पैसे मागणाऱ्याला लोखंडी पाईपने मारहाण

0

पिंपरी : दारुसाठी पैसे मागितले याच्या रागातून लोखंडी पाईपनेच पैसे मागणाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.15) रात्री साडे सातच्या सुमारास चिंचवड येथील वेताळनगर परिसरात घडली आहे.

रोहीत चव्हाण (28, रा.चिंचवड) असे जखमी व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी जखमीच्या पत्नीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अरबाज इसमाईल शेख (23, रा.चिंचवड) याच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी शेखला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण हा शुक्रवारी रात्री शेख याच्याकडे दारुसाठी पैसे मागण्यास गेला होता. यावेळी शेख याने पैसे देण्यास नकार दिला व चिडून चव्हाणला शिवीगाळ करत त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारले.

यामध्ये चव्हाणच्या डोक्याला जबर मार लागला असून सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. यावरुन शेख याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.