सहा मिनिटात पावणे दहा लाखांचे मोबाईल लंपास

0

पुणे : कटवणीच्या साहाय्याने शटर उचकटून दुकानातून 61 मोबाईल चोरून नेले. या घटनेत चोरट्यांनी 9 लाख 69
हजाराचे मोबाईल अवघ्या सहा मिनिटात दुकान फोडुन लंपास केले.

धायरी परिसरातील रायकर नगर येथे शनिवारी रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. दुकान मालक सचिन दत्तात्रय सांगळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रायकरनगर येथे सांगळे टेलिकॉम मोबाईल हब या नावाने दुकान आहे. शनिवारी रात्री एकच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी कटवणीच्या सहाय्याने दुकानाचे शटर उचकटले आणि आत प्रवेश केला. त्यानंतर अवघ्या सहा मिनिटात त्यांनी दुकानातील 61 मोबाईल, स्मार्ट वॉच आणि इतर वस्तू एका पोत्यात भरून दिल्या. हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चोरट्यांनी दुकानात प्रवेश करण्यापूर्वी संपूर्ण तोंड कपड्याने झाकून घेतल्याचे दिसत आहे.

या संपूर्ण प्रकरणाने पुन्हा एकदा शहरातील चोरीच्या घटनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने पुणे शहरात चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अवघ्या सहा मिनिटात चोरी करणाऱ्या या चोरट्यांना पकडण्याचा मोठे आव्हान सिंहगड पोलिसांसमोर आहे. पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.