नर्मदा नदी अपघात : मृत्यू झालेल्या 12 जणांची ओळख पटली

0

मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील इंदोर येथून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळून 13 जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत 12 मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले असून सर्व मृतदेहांची ओळख पटली आहे.

एमएसआरटीसीच्या अमळनेर आगाराची अमळनेर बस क्रमांक MH40N 9848 ही (18 जुलै) सकाळी 7.30 वाजता इंदोरहून निघाली. त्यानंतर मध्य प्रदेशातील खलघाट आणि थिगरी दरम्यान नर्मदा नदीच्या पुलावर बसचा अपघात झाला आणि ती नर्मदा नदीत पडली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एमएसआरटीसीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून मदत आणि बचाव कार्याची विनंती केली. स्थानिक जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या बचाव मोहिमेत 12 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

एमएसआरटीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले, कि ”हे सर्व मृतदेह धामनोट येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून त्यानुसार शोध मोहीम अद्याप सुरू आहे. हा अपघात अत्यंत दुर्दैवी आहे आणि अशा घटना रोखण्यासाठी महामंडळाकडून उपाययोजना केल्या जातील, या अपघाताचे कारण शोधण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे आणि समितीला या प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे.

अपघातातील सर्व मृतांची ओळख पटली आहे

1. चंद्रकांत एकनाथ पाटील – (45) (चालक) अमळनेर

2. प्रकाश श्रावण चौधरी (कंडक्टर), अमळनेर

3. अविनाश संजय परदेशी, अमळनेर

4. राजू तुलसीराम (35), राजस्थान

5. जगन्नाथ जोशी (68), राजस्थान

6. चेतन जागिड, राजस्थान

7. निंबाजी आनंदा पाटील, अमळनेर

8. सैफुद्दीन अब्बास अली बोहरा, मध्य प्रदेश

9. कल्पना विकास पाटील (57) धुळे

10. विकास सतीश बेहरे (33) धुळे

11. अरवा मुर्तजा बोहरा (27) अकोला

12. रुख्मणीबाई जोशी, राजस्थान

Leave A Reply

Your email address will not be published.