मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची विस्ताराला मुहूर्त लागला असून भाजपच्या केंद्रीय कार्यकररिणीसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होणार आहे. यानंतर उद्या एकाच टप्पात 30 जणांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला 4 आमदारांमागे एक मंत्रिपद असे 13 मंत्रिपदे देण्यात येणार आहे. शिंदेंच्या गटात सामील झालेल्या 5 जणांकडे आधीच कॅबिनेट मंत्रिपद होते, तर अब्दुल सत्तार आणि शंभुराज देसाईंकडे राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती. शिंदे गटाला मिळणाऱ्या 13 मंत्रिपदामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद देखील आहेत. यात एकनाथ शिंदेंसह 5 जणांचा मंत्रिमंडळ विस्तारात नंबर लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे उपस्थित राहणार आहे. मात्र हा कार्यक्रम संध्याकाळी असला तरी मुख्यमंत्री 4 वाजता दिल्लीत जाणार आहेत. यानंतर ते भाजप पक्षश्रेष्ठीसोबत चर्चा करणार आहेत. यानंतर उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.