सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

0

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज (22 जुलै) रोजी सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डाकडून यावर्षी 12 वी बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जावून हा निकाल पाहता येणार आहे. सीबीएसईने cbse.nic.incbse.gov.incbseacademic.nic.in हे अधिकृत वेबसाइट दिले आहेत.

सीबीएसई बोर्डाकडून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि शाळा क्रमांक टाकावा लागणार आहे. यंदाच्या 12 वीच्या परीक्षेत एकूण 92.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

असा पाहा निकाल –

– विद्यार्थ्यांनी प्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्यावी.
– त्यानंतर मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या 10वी किंवा 12वीच्या निकालाशी संबंधित लिंकवर क्लिक करावे.
– येथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आदींची माहिती प्रविष्ट करून सबमिट करा.
– यानंतर तुम्हाला स्क्रिनवर तुमचा परीक्षेचा निकाल दिसेल.

Leave A Reply

Your email address will not be published.