पुणे-नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात पोलीसाचा मृत्यू

0

पिंपरी : पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे झालेल्या अपघातात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास झाला.


विजय आखाडे या पोलीसाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार; आखाडे हे त्यांच्या कारने (एमएच 14, एफएस 2218) यातून नाशिक फाट्यावरून चाकणच्या दिशेने निघाले होते. दरम्यान भोसरी येथे गेल्यानंतर त्यांच्या कारला अपघात झाला.

आखाडे यांची कार रस्ताकडेला असणाऱ्या झाडावर आदळली. यामध्ये आखाडे यांचा मृत्यू झाला. आखाडे हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिंचवड पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.