भारतात गरीबही स्वप्न पाहू शकतो व पूर्णही करु शकतो : राष्ट्रपती मुर्मू

0

नवी दिल्ली : देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी संसद भवनात शपथ घेतली. देशाच्या पहिल्या आदिवासी आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती होण्याचा इतिहास आज रचला गेला. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

आपल्या पहिल्या भाषणात भावूक झालेल्या त्या पहायला मिळाल्या. भारतात गरीब स्वप्नंही पाहू शकतो व पूर्णही करु शकतो, अशी त्यांनी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली.

आज सकाळी साडेनऊच्या सुमारास द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांना गार्ड आफ आनर देण्यात आला. त्यानंतर सव्वादहा वाजता सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी मुर्मू यांना राष्ट्पती पदाची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्रीमंडळ सदस्य उपस्थित होते.

द्रौपदी मुर्मू यांनी सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती होण्याचा सन्मान मिळविला आहे. आज अनेक संकटांचा सामना करत त्यांनी राष्ट्रपती भवनापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. त्यांच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडल्या ज्याने त्या पूर्णपणे कोलमडून गेल्या होत्या. पण त्यांनी पुन्हा नव्या उमेदीने उभं राहून आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग निवडला. ओडीशा राज्यात जन्मलेल्या मुर्मू यांच्या आयुष्यात आलेल्या वादळांबाबत अनेकांना माहिती नाही. या एका सर्वसाधारण महिलेचा राजकारणातील प्रवासही उल्लेखनीय आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.