मुंबई : पुण्यातील नामाकिंत बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना मुख्य प्रकरणातही जामीन मंजुर झाला आहे. डी. एस. कुलकर्णींचे वकील अशुतोष श्रीवास्तव यांनी सर्वोच्च न्यायालयाकडुन थोड्याच वेळा पुर्वी जामीन मंजुर झाल्याची माहिती दिली आहे.
कुलकर्णी यांना पाच दिवसापुर्वी सदनिकांच्या मालकी हक्कासंदर्भात महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स अॅक्ट (MOFA, मोफा) अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात पुणे न्यायालयाने गुरुवारी (ता. 21) जामीन मंजूर केला होताै. याच प्रकरणातील मुख्य केसेसमध्ये जामिन मंजुर झाल्याने, कुलकर्णी यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते आहे. याबाबतथोड्याच वेळात माहिती मिळण्याची शख्यता आहे.
वकील अशुतोष श्रीवास्तव आणि वकील रितेश येवलेकर यांनी न्यायालयात कुलकर्णी यांची बाजू मांडली. सिंहगड पोलीस स्थानकामध्ये या प्रकरणी ऑगस्ट २०१६ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनुसार कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेतली. त्यानंतर जाणीवपूर्वकपणे डीएसके आणि त्यांच्या पत्नीने या ग्राहकांना घरांचा मालकी हक्क हस्तांतरित केला नाही. या प्रकरणी कुलकर्णी दांपत्याला ५ मार्च २०१९ रोजी अटक करण्यात आली होती.
पुणे न्यायालयात न्यायमुर्ती एस. के. दुगावकर यांनी मोफा कायद्याअंतर्गत कुलकर्णी यांना जामीन मंजूर केलाय. “या प्रकरणातील गुन्ह्यांसाठी कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने अर्धी शिक्षा भोगली आहे. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांनंतर त्यांना अचानक अटक करण्यात आली,” असं कुलकर्णींच्या वकिलांनी म्हटलं आहे. मुख्य प्रकरणामधील एफआयआरसंदर्भातील अर्ज हा सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल करण्यात आला होता. त्याची सुनावणी आज (२६ जुलै २०२२) रोजी सुनावणी झाली. यात न्यायालयानने जामिन मंजुर केल्याचे श्रीवास्तव यांनी स्पष्ठ केले आहे.