पिंपरी : पोलिसांनी दोन विविध प्रकरणात पाच देशी पिस्टल व 6 जिवंत काडतूसे जप्त केली आहेत.
पहिल्या प्रकरणात चाकण येथे पोलिसांनी नितीन थिटे (25 रा. रेटवडी, ता. खेड) या आरोपीस अटक केली आहे. 27 जुलैला संध्याकाळी चाकण येथील नाशिक पुणे महामार्गालगत सर्व्हिस रोडवर नाणेकरवाडी अंडरब्रिज येथे आरोपी थिटे यांच्याकडे 1 देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडततुस बेकायदेशीररित्या मिळाली आहेत.
दुसऱ्या प्रकरणात एमआयडीसी भोसरी येथे वेदांत माने (25, रा. लांडेवाडी भोसरी) या आरोपीस अटक केले आहे. त्याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
27 जुलैला संध्याकाळी इंद्रायणीनगर, भोसरी येथे त्याच्या ताब्यात 1 लाख रुपये किंमतीचे 4 गावठी पिस्टल व 1,200 रुपये किंमतीचे चार जिवंत राऊंड बेकायदेशीररित्या मिळाली आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त काकासाहेब डोळे, सहाय्यक आयुक्त पद्माकर घनवट, प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्र विरोधी पथकाचे निरीक्षक राजेंद्र निकाळजे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.