मुंबई : राज्यात दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना देणार आहेत.
तशी माहिती खुद्ध एकनाथ शिंदे यांनीच दिली आहे. त्यानुसार राज्यात आता दहहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच याबाबतची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे.
“गोविंदा उत्सव हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा सण आहे. काही ठिकाणी सार्वजनिक सुट्टी जिल्हाधिकारी जाहीर करतात. पण मी मुख्यसचिवांना सांगून दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना मी देणार आहे”, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
गेली दोन वर्षे गणेशोत्सवासह सर्वच सण कोरोनाच्या छायेत अनेक निर्बंधांसह साजरे करावे लागले होते. मात्र यावर्षी गणेशोत्सव, दहीहंडी नवरात्र कुठल्याही निर्बंधांविना धुमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडीवर यावर्षी कुठलेही निर्बंध नसतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.