अविनाश भोसले यांचे ‘हेलिकॉप्टर’ सीबीआयकडून जप्त

0

पुणे : बहुचर्चित येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्या प्रकरणी सीबीआयच्या कोठडीत असलेले पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांना आणखी एक मोठा धक्का बसला असून भोसले यांचे ऑगस्टा वेस्टलँड कंपनीचं ‘हेलिकॉप्टर’ सीबीआयने जप्त केले आहे.

अविनाश भोसले यांनी लंडनमध्ये एक संपत्ती खरेदी करण्यासाठी डीएचएफएलकडून मिळालेल्या ५५० कोटी रुपयांपैकी ३०० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक झाली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.तसेच ईडीनेही त्यांचा ताबा घेतला होता. सीबीआयनं जो तपास केला आहे तो डीएचएफल संबंधित होता.

Leave A Reply

Your email address will not be published.