31 जुलै रोजी 67 लाख 97 हजार 67 करदात्यांनी आयकर भरला

0

भरला

नवी दिल्ली : आयकर परतावा भरण्यासाठी 31 जुलै रोजी शेवटची मुदत होती. त्यानंतरही तुम्ही आयकर परतावा दाखल करु शकता, पण तुम्हाला त्यासाठी दंड भरावा लागेल.

रविवारी शेवटच्या दिवशी अनेक नागरिकांनी विना दंड आयकर परतावा दाखल केला. आयकर विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. 31 जुलै रोजी 67 लाख 97 हजार 067 आयटी रिटर्न भरण्यात आल्याची माहिती आयकर विभागाने ट्विट करत दिली आहे.

आयकर विभागाने आयकर परतावा दाखल केल्याची माहिती रविवारी रात्री ट्विट दिली. या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘आज भरलेल्या आयकर परताव्याची आकडेवारी. आज रात्री 11 वाजेपर्यंत 67 लाख 97 हजार 67 आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. तर गेल्या एका तासात 4 लाख 50 हजार 13 आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. कोणत्याही मदतीसाठी, कृपया [email protected] वर किंवा आमच्या हेल्प डेस्क नंबर 1800 103 0025 आणि 1800 419 0025 वर संपर्क साधा.

दरम्यान, ज्यांनी 31 जुलै रोजी आयकर परतावा भरला नाही, ते अद्यापही आयटीआर दाखल करु शकतात. पण यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. आयकर परतावा भरण्यासाठी तुम्हाला 5000 हजार दंड आकारला जाईल. सरकारने आयटी रिटर्न भरण्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख दिली होती. आयटी रिटर्नसाठी सरकारने अद्याप तारीख वाढवलेली नाही, त्यामुळे आयकर परतावा न भरलेल्यांना दंडासह आयटी रिटर्न भरावा लागेल. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना विलंब शुल्क म्हणून 1000 रुपये भरावे लागतील. वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असल्यास 5000 रुपये दंड भरावा लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.