खासदार संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

0

मुंबई : खासदार संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ईडी न्यायालयाने सोमवार दिनांक ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय साऊत यांना ईडीने चार 31 ऑगस्ट रोजी अटक केली होती त्यानंतर कोर्टात हजर केले असता ३ दिवसांची कोठडी सुनावली होती. आज कोठडी संपल्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांना विशेष इडी कोर्टात हजर केले. संजय राऊत कोर्टात धनुष्य बाण चिन्ह असलेला भगवा मफलर घालून आले होते तो मफलर त्यांनी काढला जेव्हा त्यांना लक्षात आले की, ते कोर्टात आले.

त्यानंतर सुनावणी सुरू झाली. तपासात नवीन आर्थिक व्यवहारांची माहिती समोर आलीये तसंच काही व्यक्तींची आणि संजय राऊत यांची समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. याकरता कोठडीत वाढ करुन देण्यात आली आहे. अलिबाग येथे जमिन घेतली तेव्हा जमिन मालकाला १.१७ कोटी रुपये रोख दिल्याचे ईडीने तपासात उघड झाल्याने सांगितले आहे.

न्यायमूर्ती – ईडी कोठडीत काही त्रास झाला का? संजय राऊत – ज्या ठिकाणी मला ठेवलंय तिथे वेंटिलेशन नाही. मला हार्टचा त्रास असल्याने गुदमरायला होते. संजय राऊत – रात्री जिथे झोपायला देतात तिथेही वेंटीलेशन नाहीये.

फक्त एक छोटासा फॅन आहे ईडी – या बाबत दिलगिरी व्यक्ती करतो. पण त्यांना जिथे ठेवलय तिथे एसी आहे. कारण संपूर्ण इमारत एअर कंडिशनर आहे. जर त्यांना एसी नको असेल तर अशा अनेक रुम आहेत जिथे आम्ही त्यांना ठेवू शकतो.

संजय राऊत – एसीचा मला त्रास होतो. थोडी हवा तरी हवी ना ईडी : संजय राऊत यांना आता नॉन एसी रुममध्ये ठेवणार न्यायमूर्ती – ईडीने त्यांची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण ते इडीच्या कोठडीत आहेत ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांचा युक्तीवाद – प्रवीण राऊत याला पत्रा चाळ प्रकरणी मिळालेला ११२ कोटींच्या रक्कम मधील काही रक्कम रोख स्वरुपात मिळाली. तसंच नॅशनल आणि इंटरनॅशनल प्रवासा करतात देखील प्रविण राऊत याने राऊत परिवाराला पैसे दिलेत – तसंच दर महिना २ लाख रुपये प्रविण राऊत हा संजय राऊत यांना देत होता. – काही संशयास्पद कागदपत्रे जप्त केली होती ती संजय राऊत यांच्या समोर चौकशी दरम्यान सादर केली होती.

पैशांच्या बाबतीत ती कागदपत्रे होते, त्याबाबत काहीच माहिती नाही असं राऊत बोलत आहे. – काही अशा एका व्यक्तीला आम्ही चौकशीला बोलावले आहे ज्या व्यक्तीचे नाव आम्ही इथे घेवू शकत नाही त्या व्यक्तीला आणि राऊतांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. – राऊत आधीच्या चौकशीत ज्या आर्थिक व्यवहारांबाबत नकार देत होते त्याची कागदपत्रे त्यांच्या घरात झडती दरम्यान सापडली आहेत. – काही असे कागदपत्रे सापडले आहे, ज्यातून असं दिसतंय की संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना मोठी रक्कम पाठवली गेली आहे.

वर्षा राऊत यांच्या खात्यातून खूप मोठ्या रक्कमेचे ट्रान्सॅक्शन झाले आहे. जवळपास १ कोटी ८ लाख रुपये नुकतेच पाठवण्यात आले आहे. त्यामुळे संजय राऊत यांची १० ॲागस्टपर्यंत कोठडी द्यावी. संजय राऊत यांच्याकडून अशोक मुंदरगी यांचा युक्तिवाद – या प्रकरणी प्रविण राऊत याला अटक झाली त्याच्या संबंधी ईडीने आरोप पत्र दाखल केले आहे.

त्यामुळे आमच्या कोठडीची गरज नाही. तुम्ही जेव्हा चौकशीला बोलवाल तेव्हा येऊ शकतो. ईडीचे वकील – वर्षा राऊत यांच्या खात्यात १ कोटी ८ लाख रुपये जमा करण्यात आलेत अशोक मुंदरगी – १ कोटी ८ लाख रुपयांबाबत आरोप केलेत त्याची उत्तर आम्ही देवू पण त्या करता कोठडीची गरज नाही कारण ही अटक पुर्णतः राजकीय आहे त्यामुळे कोर्टाने याचा विचार करावा. संजय राऊत- माझ्या सर्व संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रात दिलीये स्वप्ना पाटकर यांनी मध्यस्थी याचिका केली.

त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. मला धमकी देण्यात आली. त्यामुळे त्यांची कोठडी वाढवावी न्यायमूर्ती – ते कोठडीत आहेत मग ते धमकी कशी देवू शकतात? पाटकरांचे वकील – ते बलाढ्य व्यक्ती आहेत काहीही करु शकतात. न्यायमूर्ती – इडी आणि राऊत यांच्या वकिलांनी आपले म्हणणे मांडावे न्यायमूर्ती – हे ईडी कोर्ट आहे तुम्ही सांगा तुमचा अर्ज वैध कसा. इडीचे वकील तुम्ही सांगा स्वप्ना पाटणकर यांच्या वकिलांनी केलेला आरोप की चौकशीला बाधा पोहोचते का ? ईडी वकील – आम्ही त्यांचे ऐकून घेवू पाटकर वकील – सर्व कागदपत्रे आणि ॲाडिओ रेकॉर्ड आम्ही इडीला जमा करू.

Leave A Reply

Your email address will not be published.