पुणे : वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साळुंखे विहार परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेले सेक्स रॅकेट गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उध्वस्त केले.एक्स्ट्रा सर्विसच्या नावाखाली सुरू असलेले सेक्स रॅकेट उधठिकाणाहून चार पीडित तरुणींची सुटका केली. वानवडीतील साळुंखे विहार येथील उच्चभ्रू परिसरातील गिरमे हाईट्स मधील ‘गोल्डन टच स्पा’ येथे केलेल्या या कारवाईत एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
व्यवस्थापक झारणा उर्फ पिंकी गौतम मंडल (27, रा. कोंढवा), सुमित अनिल होनखंडे (21) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, स्पा मालक रचना संतोष साळुंखे, स्पा मालक लोचन अनंता गिरमे, सार्थक लोचन गिरमे (सर्व रा. कोंढवा) यांच्यावर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरमे हाईट्स येथील गोल्डन स्पा सेंटर मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवत असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. यानुसार पथकाने येथे छापा टाकला असता वेश्या व्यवसाय करवून घेण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी येथून छतीसगड आणि पश्चिम बंगाल राज्यातील प्रत्येकी एका महिलेसह एकूण चार पीडित तरुणींची सुटका केली. तर, त्यांच्याकडून व्यवसाय करून घेणाऱ्या दोघांना अटक केली आहे.चार पीडित तरुणींची सुटका केली. वानवडीतील साळुंखे विहार येथील उच्चभ्रू परिसरातील गिरमे हाईट्स मधील ‘गोल्डन टच स्पा’ येथे केलेल्या या कारवाईत एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.