मुंबई : पत्राचाळा घोटाळ्याप्रकरणी शिवसेने नेते संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आजापासून संजय राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात असणार आहे.
या सर्वामध्ये न्यायालयाने राऊतांना घरचं जेवण आणि औषधं देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राऊतांना काहिसा दिलासा मिळाला आहे.पत्राचाळ जमीन प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने आता राऊतांना जामीन अर्ज करता येणार आहे.
पत्राचाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी ईडीनं ९ तास संजय राऊतांची चौकशी केल्यानंतर 31 जुलै रोजी रात्री उशीरा अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दोनदा ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्याची मुदत संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने राऊतांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून, आता राऊतांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात असणार आहे.
या सर्वांमध्ये दिलासादायक बाब म्हणजे राऊतांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने आता जामीन अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याशिवाय न्यायालयाने राऊतांना घरचं जेवण आणि औषधं देण्यासही परवानगी दिली आहे.