प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

0

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. मुंबईत आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाआहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गिरगावातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रदीप पटवर्धन यांची मोरुची मावशी या नाटकातील भूमिका अतिशय गाजली होती. मुली विजय चव्हाणांसाठी जितकी मोरुची मावशीबघायला येतं, त्यापेक्षा जास्त प्रदीपसाठी येतं असतं, इतकी क्रेझ त्यांची होती, अशी आठवण दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या मावशीवसुंधरा साबळे यांनी सांगितली आहे.

लेखक आणि गीतकार ओंकार मंगेश दत्त यांच्या आई आणि दिग्दर्शकनिर्माते केदार शिंदे यांच्या मावशी वसुंधरा साबळे यांनी प्रदीपपटवर्धन यांच्या आठवणींना उजाळा देणारी एक पोस्ट फेसबुकवर शेअऱ केली आहे. त्यात त्या लिहितात, “आज आमचा प्रिय मीत्रप्रदीप उर्फ पट्या आम्हाला सोडून गेला..ही धक्कादायक बातमी मला आत्ता केदारने कळवली आणि क्षणभर काहीसुचेचनाक्षणभरातच माझ्या आयुष्यातल्या प्रदीपच्या आठवणी झरझर डोळ्या समोरुन सरकत गेल्यातारुण्यात अतिशय देखणादिसणारा प्रदीप मुलींच्या गळ्यातला अक्षरशः ताईत होता..गिरगावात तो रहायचा आणि गणपती विसर्जनात प्रदीपचा नाच हे तिथलंमुख्य आकर्षण असायच..एकांकिका करत करत तो नाटकांकडे वळला..टूर टूर, मोरुची मावशी ही त्याची त्याच्या तारुण्याच्याउंबरठ्यावरची नाटकं..मुली विजय चव्हाणसाठी जितकं मोरुची मावशी बघायला येत त्यापेक्षा जास्त प्रदीपसाठी येत असतं इतकी क्रेझहोती त्याची..न्रुत्य ही त्याची आवड होती आणि म्हणुनच आमच्या लोकधारामधेआठशे खिडक्या नवूशे दारंसाठी प्रदीपची वर्णीलागली आणि त्याने त्याच अक्षरशः सोनं केल..त्याच्या सारखा तो डान्स परत कुणीही करु शकल नाही..”

Leave A Reply

Your email address will not be published.