चायनीज सेंटर मध्ये ग्लास सांडल्याच्या रागातून ग्राहक महिलेला पुलावरून ढकलेले

0

पिंपरी : ग्लास सांडल्याच्या रागातून चायनीज सेंटरच्या मालकाने एका महिलेला चक्क पुलावरून ढकलून दिले आहे. ही घटना चिखली येथे 15 जुलै रोजी घडली. महिला जखमी असल्याने गुन्हा सोमवारी (दि.8) चिखली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी यावरून सोहेल (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रोशनबार येथे चायनीज खात असताना एका मुलाच्या हातुन ग्लास सांडला. मात्र वेटरला तो ग्लास फिर्यादी यांनी सांडवला असे वाटले. म्हणून त्याने त्याचा मालक सोहेलला सांगितले. सोहेलने रागाच्या भरात फिर्यादी यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत त्यांना सेंटरमधून बाहेर काढले.

फिर्यादी या स्पाईन रोडने घरकूलकडे जाणाऱ्या ब्रीजवर रडत थांबल्या होत्या यावेळी आरोपी तेथे आला व त्याने फिर्यादी यांना पुन्हा मारहाण करत त्यांना थेट पूलावरून ढकलून दिले.यामध्ये फिर्यादी यांच्या पाठीला, कंबरेला व दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यावरून चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.