पुणे : पवना धरण परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सकाळपासून धरण परिसरात 36 मिली मीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे पाणीसाठ्यात 5 टक्यांनी वाढ झाली असून धरणातील एकूण पाणीसाठा 95.80 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणातून पाणी नदीत सोडण्यात आले आहे.
पवना धरण परिसरात 1 जूनपासून 1 हजार 955 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. मागील चार दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे झपाट्याने धरणातील पाणीसाठा वाढला. चार दिवसात 15 टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर कायम होता. दिवसभरात 5 टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे धरणातील पाणीसाठा 95.80 टक्क्यांवर पोहोचला आहे.
याबाबत बोलताना पवना धरणाचे शाखा अभियंता समीर मोरे म्हणाले, “धरणातून पाणी नदीत सोडण्यापूर्वी नदी काठच्या नागरिकांना सतर्क केले जाईल. उद्या (शुक्रवारी) सकाळी धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन आहे. त्याबाबत रात्री कळविले जाईल. सध्या पाणी सोडण्याचे नियोजन नाही. सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे.