अमेझॉन कंपनीच्या वेअरहाऊसवरील दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक

0

पिंपरी: खेड तालुक्यातील वराळे येथे अमेझॉन कंपनीचे मोठे वेअरहाऊस आहे. येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपी व दोन अल्पवयीन मुलांना म्हाळुंगे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हि करावाई रविवारी (दि.14) रात्री दहाच्या सुमारास करण्यात आली.

सागर राहूल खेडकर (20, रा.भोसरी), महेश कान्हा राजपूत (19, रा. भोसरी) यांना अटक केले असून, त्यांच्या दोन अल्पवयीन साथादारांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, यातील भिष्मा उर्फ झिंगरू शंकर राठोड हा अद्याप फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी बातमीदारामार्फेत मिळालेल्या बातमीनुसार कारवाई करत वराळे गावच्या हद्दीतील कॉर्नींग कंपनीच्या जवळ आरोपींना अटक केले. यावेळी त्यांच्याकडे लोखंडी रॉड, लोखंडी कटावणी व कोयता, लोखंडी पाईप तसेच तसेच दुचाकी असा एकूण 30 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी आरोपींकडे अधिक तपास केला असता ते वराळे येथील अमेझॉन कंपनीवर दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले. याचा पुढील तपास म्हाळुंगे पोलीस करत आहे. वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.