श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथील समुद्रकिनारी एक संशयित बोट आढळली आहे. या बोटीमध्ये एके-४७ आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. रायगड पोलीस गस्त घालत असताना ही बोट आढळली आहे.
या बोटीत एकही व्यक्ती सापडली नसून बोटीत तीन एके ४७ आढळल्या आहे. तसेच अनेक कागदपत्रेही सापडली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे.
या संदर्भात स्थानिक आमदार अनिकेत तटकरे यांनी हा मुद्दा विधानपरिषदेत उपस्थित केला. आज सकाळी ही बोट सापडली असून या बोटीत तीन एके ४७ कागदपत्रे आणि अडीचशे जिवंत काडतुसे सापडली असल्याची माहिती आहे, असे यावेळी बोलताना आमदार अनिकेत तटकरे म्हणाले.