पुण्याच्या सावंत दाम्पत्याने आफ्रिकेतील ‘किलीमंजरो’वर फडकविला तिरंगा
19 हजार 341 फूट उंच शिखरावर केला यशस्वी खडतर प्रवास
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या तृषा आणि विराज सावंत या दाम्पत्याने स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त आफ्रिकेतील शिखरावर तिरंगा फडकवला. खडतर प्रवास करत 19 हजार 314 फूट उंच असणारे शिखर यशस्वी पार केले.
तृषा आणि विराज यांनी सांगितले, “आम्ही प्रवासाला (ट्रेकिंगला) मारांगू गेट पासून सुरू केले. पुढे मंदारा हट पासून होरंबो हट आणि मग कीबो हट पर्यंत आम्ही 3 दिवसात पोहचलो. तेथील वेगळ्या वातावरणात मिसळणे आणि आपल्याला त्याची सवय लावून घेणे फार अवघड होते.
दोघांनीही मनाची तयारी करुन तेथील वातावरणाशी एकजूट करुन घेतले. कीबो हट पासून गिलमेंन पॉईंट आणि त्यानंतरचा स्टेला पॉईंट हा सर्वात कठीण भाग होता.” उहूरु पीक हे किलीमंजरोचा सर्वात हायेस्ट पॉईंट आहे. जवळजवळ तो सहा ते सात तासाचा ट्रेक (प्रवास) आहे.
अतिशय थंड आणि वादळी अशा वातावरणात तृषा आणि विराज या दोघांनी प्रवास केला. मध्यरात्री सुरू करून समिट करणे हे फार कठीण आहे. या आधी तृषा हिने ट्रेकिंग व्यतिरिक्त व्हॉलीबॉल मध्येसुद्धा नांव मिळवले आहे.
तृषाला किलीमंजरो’ शिखर सर करताना लडाखच्या ट्रेकिंगचा अनुभव कामी आला असल्याचे तिने संगीतले. तीचे वडील राजेंद्र भुते हे तीचे आधार स्तंभ आहेत. यासाठी सुमारे दोन महिने कठोर परिश्रम केले आहेत. सावंत दाम्पत्याच्या यशस्वी कामगिरीबाबत त्यांचे सर्वस्तरातून स्वागत केले जात आहे.