शिंदे-फडणवीस सरकारला दणका, चारच्या प्रभागरचनेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

महापालिकेची निवडणूक तीनच्या प्रभागरचनेनुसारच होणार ?

0

मुंबई : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार (2017 च्या प्रभाग रचनेनुसार) घेण्याच्या शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रिम कोर्टाच्या या स्थगिती निर्णयाने शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का बसला आहे.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तास्थानी आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील महापालिका निवडणुका चार प्रभाग पध्दतीने घ्याव्यात, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले. या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टात दाद मागितली. त्यावर आज शिंदे-फडणवीस सरकारने चालवलेल्या चुकीच्या निर्णय पध्दतीला सुप्रिम कोर्टाने स्थगिती दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारने 2022 च्या महापालिका निवडणुका घेण्यासाठी तीन सदस्यीय प्रभागरचना निश्चित केली होती. त्यानुसार ओबीसीसह आरक्षण सोडत देखील जाहीर करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम देखील तयार केला. काही दिवसांत निवडणुका जाहीर होणार असतानाच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.

त्यांच्या जागी आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने सत्तास्थानी येताच प्रथम महापालिका निवडणुकीची त्रीसदस्यीय प्रभाग पध्दतीने निवडणूक घेण्यास नकार दर्शविला. ही प्रभागरचना रद्द करण्याचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिले. याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुप्रीम कोर्टात दाद मागितली. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने शिंदे -फडणवीस सरकारच्या चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याच्या मनसुब्याला स्थगिती दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.