मुंबई : आज मंत्रालयात पुन्हा एक थरारक घटना घडली. काही मराठा तरुण मंत्रालयाच्या टेरेसवर जाऊन बसले होते. प्रशासनाच्याकारभारामुळे त्रस्त होऊन आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल त्यांनी उचलल्याची माहिती आहे. त्यातील एक युवक तब्बल अर्धा तासटेरेसवर खाली पाय सोडून बसला होता. हे कळताच आमदार निलेश लंके यांनी धावत जाऊन उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यामदतीने आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणांची समजूत घालून त्यांना खाली उतरवले.
निलेश लंके यांनी सांगितले की, मंत्रालयातून काम उरकून खाली येत असताना मंत्रालयाच्या टेरेसवर काही युवक गेल्याचे कळाले. तेव्हामी स्व:ता पळत गेलो. यावेळी माझ्यासोबत काही अधिकारी होते. आम्ही त्यांना आवाज दिला तर तर दोन पाऊले जरी पुढे आलात तरउडी घेऊ असे युवकांनी म्हटले. तेव्हा मी त्यांच्याशी फोनवरुन बोललो आणि विश्वास दिला. मग त्यांनी मला जवळ येऊ दिले. मीत्यांच्या जवळ गेलो आणि त्यांची समजूत घातली आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करण्याची ही आजच्या दिवसातील दुसरी घटना आहे. सकाळी विधानभवनाबाहेर एका शेतकऱ्यानेअंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. सुभाष भानूदास देशमुख, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते उस्मानाबादमधीलधाराशिवचे रहिवासी आहेत. घटनेत गंभीररित्या भाजलेल्या शेतकऱ्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले होते.