पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस सेवानिवृत्ती अधिकार्याचा समारंभ संपन्न झाला. भोसले पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, देहूरोड विभाग हे नियत वयोमानानुसार पोलीस दलातून सेवानिवृत्त होत असल्याने त्यांचा सेवापूर्ती सोहळा आज आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात बोलताना अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड म्हणाले की, पोलीस दलात कर्तव्य बजावणी ही एक अभिमानाची बाब आहे. समाजासाठी आपण दिलेले योगदान नक्कीच कौतुकास्पद आहे. सेवानिवृत्तीनंतरही आपल्या हातून अशीच जनसेवा घडावी असे बोलून सत्कारमूर्ती पोलीस अधिकारी पाटील यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन पुढील वाटचालीस व भावी आयुष्यात शुभेच्छा दिल्या. पाटील यांनी त्यांच्या सेवा कालावधीमध्ये त्यांना आलेले वेगवेगळे अनुभव सांगून पोलीस दलामध्ये राहून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रम प्रसंगी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, डॉ काकासाहेब डोळे, पोलीस उप-आयुक्त मुख्यालय, मंचक इप्पर, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-1, प्रशांत अमृतकर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, डॉ सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, अनिल दबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष शाखा, श्रीकांत दिसले सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड विभाग, रावसाहेब जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी सत्कारमूर्ती पाटील यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.