लाखोंची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

पिंपरी : विकसीत होत असलेल्या प्रकल्पामध्ये ॲल्युमिनियम विंडो आणि एस एस ग्लास रोलिंगचे केलेल्या कामाचे पैसे न देता व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार हिंजवडी मध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन जणांवर हिंजव़डी पोलीस ठाण्यात आयपीसी 420, 406 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार हिंजवडी येथील मे. मॅग्नोवा रिअल्टी प्रोजेक्टमध्ये 2018 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत घडला.

किरण भुमकर, अमर भुमकर (दोघे रा. भुमकर नगर, वाकड ब्रिज जवळ, पुणे) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हरिष गुलाब वाघिरे (34, रा. तपोवन मंदिर रोड, पिंपरी वाघेरे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात रविवारी (दि.4) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांनी हिंजवडी येथे विकसित होत असलेल्या मॅग्नोवा रिअल्टी या
प्रकल्पामध्ये ॲल्युमिनियम विंन्डे व एस एस ग्लास रोलिंगचे काम केले आहे. या कामाचे 50 लाख 33 हजार 908 रुपये झालेल्या बिलापैकी आरोपींनी फिर्यादी यांना 37 लाख 55 हजार 500 रुपये डिसेंबर 2018 मध्ये दिले आहेत. उर्वरित 12 लाख 78 हजार 108 रुपये फिर्यादी यांनी मागितले.

त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना प्रत्येकी 6 लाख 39 हजार 054 रुपयांचे कोटक महिंद्रा बँक वाकड शाखेचे दोन चेक दिले. फिर्यादी यांनी चेक बँकेत जमा केले मात्र अमर भुमकर यांनी चेकचे स्टॉप पेमेंट करुन फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. किरण आणि अमर भुमकर यांनी 12 लाख 78 हजार 108 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मारणे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.