‘रनथॉन ऑफ होप’ २५ सप्टेंबर २०२२ रोजी रंगणार

रोटरी क्लब ऑफ निगडी, पुणे यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेमध्ये ५,००० हून अधिक धावपटू धावणार

0

 

पिंपरी : रनथॉन ऑफ होप” हा रोटरी क्लब ऑफ निगडी द्वारे आयोजित केलेला वार्षिक रनिंग इव्हेंट आहे आणि तो उत्तमरित्या  चालवला जातो.रनथॉन २०१० मध्ये सुरू झाली असून आतापर्यंत ५६,००० धावपटू सहभागी झाले आहेत.

यावर्षी टाटा मोटर्स, बँक ऑफ महाराष्ट्र, मणिपाल हॉस्पिटल्स, डेकॅथलॉन, ट्युलिप ग्रुप, डबल ट्री बाय हिल्टन, एनप्रो इंडस्ट्रीज, पूजा कास्टिंग्ज, ऋषभ इंडस्ट्रीज, एसकेएफ, सिंघल पॅकेजिंग, गुलमोहर पॅक-टेक, क्रिएटिव्ह कॉम्पोनेंट्स, ऑर्लिकॉन बाल्झर्स, अग्सा स्प्रिंग्स, बेकर ह्यूजेस यासह सुमारे २५ कॉर्पोरेट्स रनथॉनमध्ये सहभागी होत आहेत.

शर्यतीच्या या ११ व्या आवृत्तीत, १०किमी, ५ किमी आणि कॉर्पोरेट ५ किमी शर्यतीचा समावेश आहे तसेच  महिलांसाठी आणि ४५ वर्षावरील वयोगटांसाठी स्वतंत्र बक्षिसे आहेत.

यावर्षी ३ किमीची रोटरी चॅरिटी रन आहे, ज्यामध्ये रोटरी डीस्ट्रीक ३१३१ मधील १४१  क्लबमधील रोटेरियन सहभागी होणार आहेत. या शर्यतीत आघाडीचे प्रमुख डीस्ट्रीक गवर्नर डॉ.अनिल परमार व डीस्ट्रीक फस्ट लेडी डॉ.हेमा परमार हे प्रमुख पाहुणे असतील. प्रसिद्ध क्रिकेटपटू केदार जाधव यांची या स्पर्धेसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

रनथॉनमधून जमा होणारा निधी विविध प्रकल्पांसाठी वापरला जातो. अलिकडच्या वर्षांत, रोटरी क्लब ऑफ निगडीने ससून हॉस्पिटल, आकुर्डी हॉस्पिटल आणि मोरया हॉस्पिटलमध्ये आयसीयू वॉर्ड आणि ऑक्सिजन प्लांटमध्ये जीवनरक्षक उपकरणे दान केली आहेत. ग्रामीण भागात पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईन बांधणे, शाळा सुधारणे इत्यादीमुळे वंचितांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे

याविषयी अधिक माहिती देताना रोटरी क्लब ऑफ निगडीच्या अध्यक्षा प्रणिता अलूरकर म्हणाल्या की, “कोविड नंतर रनथॉन ऑफ होप पुन्हा धमाकेदारपणे परतला आहे. १२  वर्षांच्या इतिहासात प्रथमच आम्ही रोटरी वर्षाच्या सुरुवातीला निधी निर्माण करण्यासाठी मान्सून रनथॉनचे आयोजन करत आहोत. तसेच पुढील शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहेत.
•दृष्टिहीन मुलांसाठी एक विशेष शर्यत
•सशस्त्र दलांसाठी एक विशेष शर्यत
•रोटेरियन आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ३ किमी रोटरी चॅरिटी रनचे आयोजन

त्या पुढे म्हणाल्या की, जमा झालेला निधी रोटरी केंद्रीत क्षेत्रांतील पर्यावरण, पाणी आणि स्वच्छता, मूलभूत शिक्षण आणि साक्षरता, रोग प्रतिबंधक प्रकल्पांसाठी वापरला जाईल.

यावेळी पीसीएमसी आकुर्डी रुग्णालयाचे मुख्य प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर यांनी क्लबने दान केलेल्या नवजात बालकांचे आयसीयू आणि त्यामुळे नवजात बालकांचे प्राण कसे वाचले याबद्दल सांगितले.

कझाकस्तानमध्ये नुकतेच आयर्न मॅन वैभव ठोंबरे यांचे कौतुक झाले. त्यांनी त्याच्या धावण्याच्या प्रवासाविषयी सांगितले. जे त्यांच्या पहिल्या रनथॉनपासून प्रेरित होते. अलका करकरे, एमडी एनप्रो इंडस्ट्रीज यांनी कॉर्पोरेट्स आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना रनथॉनमध्ये सहभागी झाल्यानंतर कसा आनंद झाला याबद्दल सांगितले.

 

• स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी www.runathon.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
• स्थळ, वेळ आणि तारीख: महापौर बंगला प्लॉट, भेळ चौक जवळ, निगडी, २५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ५.४५ वाजता
• २०१० पासून ते आतापर्यंत ५६,००० हून अधिक  धावपटू सहभागी.
• बेकर ह्युजेस, टाटा मोटर्स, सँडविक, बँक ऑफ महाराष्ट्र, ब्रिजस्टोन, डबलट्री हिल्टन, एस के एफ , इत्यादींसह २५ हून अधिक कॉर्पोरेट्सचा सहभाग.

Leave A Reply

Your email address will not be published.