गुन्ह्यांची शतकी खेळी करणाऱ्या चोर राजाची ‘विकेट’

पिस्टल, जिवंत काडतुसे व 42 तोळे सोन्याचे दागिने जप्त

0

 

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड परिसरासह इतर ठिकाणी 100 हुन अधिक गुन्हे करणाऱ्या सराईत चोर राजाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्टल, जिवंत काडतुसे व 42 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

राजेश ऊर्फ चोर राजा राम पपलु (38 रा. कात्रज) असे अटक आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 24 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुन्हे शाखा दोनच्या पथकाला खबर मिळाली की,चोर राजा हा 31 ऑगस्ट रोजी कात्रज येथे त्याच्या घरी येणार आहे.त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला, मात्र पोलिसांचा सुगावा लागताच त्याने पळ काढला,पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटक केली.

पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता चोर राजाने चोरी केलेले 42 तोळे सोने, 4 किलो चांदी, एक पिस्टल, एक रिव्हाल्वर व दोन जिवंत काडतुसे,एक दुचाकी,दोन लोखंडी कटावण्या,दागीन्यांचे वजन करण्यासाठी मशीन असा एकूण 24 लाख 64 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या चोरीत एकटा सामील नव्हता तर पुढे तो दागिने कोमाला विकायचा तो सराफ कारागीर अजय वेदपाठक व त्याचा कोणी इतरसाथीदार होता यांचा शोध पोलीस करत आहेत.पुढील आरोपी सापडले असता आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

चोर राजावर डेक्कन पोलीस ठाणे येथे बोकायदा शस्त्र बाळगल्याचा तसेच बंडगार्जन, भारती विद्यापीठ, दत्तवाडी, सिंहगड रोड, वारजे माळवाडी, हडपसर, कोंढवा, वानवडी, सहकारनगर, वित्रामबाग, तसेच सांगली येथे असे मिळून सध्या 14 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. या आधीही त्याने पुणे पिंपरी-चिंचवड परिसरात केलेल्या 100 हून अधिक  गंभीर गुन्ह्यांची पोलिसांकडे आहे. त्यामुळे आधीपासूनच चोर राजा हा पोलिसांच्या रडावर होता. तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पाटोळे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.