पिंपरी : घरगुती वादातून पतीने डोक्यात पाटा घालून खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 21) दुपारी दीड वाजताच्या सुमारास गंधर्वनगरी, मोशी येथे उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
शांताबाई शिवराम एळवे (वय 52) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. शिवराम तुकाराम एळवे (वय 60) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराम आणि शांताबाई यांचे नेहमी घरगुती कारणांवरून वाद होत होते. दोघांचे एकमेकांशी पटत नव्हते. शिवराम हे काहीही काम धंदा करीत नव्हते.
मागील चार दिवसांपासून ते एका सुरक्षा रक्षक एजन्सी मध्ये कामाला जात होते. त्यांना एक मुलगा असून तो एका कंपनीत काम करतो. सकाळी मुलगा कामानिमित्त बाहेर गेला असताना शिवराम आणि शांताबाई यांचा पुन्हा वाद झाला. दुपारी दीड वाजताच्या सुमारास मुलगा घरी आला असता घर आतून बंद होते.