पुणे: ज्येष्ठ पत्रकार अशिष चांदोरकर यांचं आज सकाळी राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.
‘सांजसमाचार’ पासून चांदोरकर यांनी पत्रकारितेली सुरवात केली. त्यानंतर ते ‘केसरी’मध्ये पत्रकारिता केली. तेथून ते हैदराबाद येथे ‘ई टीव्ही’मध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये रुजू झाले. तेथे त्यांनी डेस्क आणि रिपोर्टिंगला काम केले. हा अनुभव घेऊन ते पुण्यात ‘सकाळ’मध्ये आले. ‘सकाळ’च्या ‘साम’चे इनपुट आणि आउटपूट या महत्त्वाच्या डेस्कची जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती.
’सामना’च्या मुंबई आवृत्तीही त्यांनी काम केले. पुण्यामध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ते उपसंपादक म्हणून रुजू झाले. ‘सकाळ’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ या दोन्ही दैनिकांमध्ये वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीवरचे लेखन प्रसिद्ध झाले. त्याला खवैयांनी मोठा प्रतिसाद दिला. या दरम्यान उदयास आलेल्या ऑनलाइन मीडियामध्ये त्यांनी स्वतःची ओळख निर्माण झाली.
महाराष्ट्र टाईम्स मध्ये उपसंपादक म्हणून देखील त्यांनी तब्बल 9 वर्ष काम केलं देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीवर मॅन ऑफ मिशन महाराष्ट्र या पुस्तकाचं लेखन देखील त्यांनी केलं होतं.
महाराष्ट्र टाईम्समधून राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सर्वज्ञ मीडिया सर्व्हिसेस या स्वतःच्या संस्थेची सुरुवात केली होती. लवंगी मिरची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फुडी आशिष या नावाने त्यांनी खाद्यभ्रमंती वर आधारित एक शो देखील सुरू केला होता.