किरकोळ कारणावरून तरुणाचा खून करणाऱ्या दोघांना अटक

निगडी पोलीस आणि गुंडा विरोधी पथकाची कामगिरी

0

पिंपरी : शनिवारी रात्री चिंचवड येथे दगडानी ठेचून तरुणाचा खून करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. स्थानिक पोलीस आणि गुंडा विरोधी पथकाने ही कामगिरी केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 24) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास दवा बाजार, आनंद नगर, चिंचवड येथे घडली होती.

सागर निलाप्पा कांबळे (26, रा. आनंदनगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सहदेव उर्फ सद्या अभिमान सरवदे (24, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) आणि विलास बालाजी शिंदे (29, रा. काळभोरनगर, चिंचवड) या दोघांना अटक केली आहे.

तरुणाचा खून झाल्याची माहिती रविवारी सकाळी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  कुणाल प्लाझा सोसायटीच्या पार्किंग मध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला होता. पोलिसांनी सागरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला व पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दोघेजण सागरसोबत दिसत आहेत.

मागील आठवड्यात सागरने एका मुलीची छेड काढली होती. त्यावरून त्याला मारहाण झाली होती. त्याला दारूचेही व्यसन होते. रात्री तिघेजण कुणाल प्लाझा सोसायटीच्या पार्किंगमध्ये आले. तिथे त्यांचा वाद झाला.

दोघांनी सुरुवातीला सोसायटीच्या पार्किंग मध्ये असलेल्या गाळ्यांच्या समोर मारहाण केली. तिथे सागरचा रक्तस्त्राव झाला. त्यानंतर आरोपींनी सागरला जखमी अवस्थेत सोसायटी समोरील अंगणात भिंतीजवळ आणले आणि दगडाने त्याचे डोके ठेचले. यात सागरचा मृत्यू झाला. पोलिसांनी काही तासात दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त इप्पर मंचक, काकासाहेब डोळे, सहाय्यक आयुक्त सागर कवडे, प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, विश्वजित खुळे, गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख हरिश माने आणि त्यांचे पथक, निगडीचे पोलीस उपनिरीक्षक उत्तम ओमासे, विलास केकान व त्यांच्या पथकाने केली आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.