नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या Indian Air Force ताफ्यात आज देशातील पहिले स्वदेशी विमान सामील झाले आहे. 10 लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरची पहिली तुकडी IAF मध्ये सामील करण्यात आली आहे.
विमानांच्या या ताफ्यामुळे भारतीय सैन्याची ताकद तर वाढेलच, शिवाय पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवरील शत्रूचा नायनाटही करता येईल. या हलक्या वजनाच्या विमानांच्या मदतीने लष्कराला क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रे सीमेवर सहज वाहून नेणे आणि शत्रूला क्षणार्धात नेस्तनाबूत करणे शक्य होणार आहे. ही विमाने उच्च उंचीच्या भागात विशेष ऑपरेशनसाठी तयार करण्यात आली आहेत.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आणि हवाई दलाचे प्रमुख, एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्या उपस्थितीत, विमानांचा ताफा जोधपूर येथे हवाई दलात Indian Air Force सामील झाला. ही विशेष प्रकारची विमाने एरोस्पेस क्षेत्रातील प्रमुख हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने विकसित केली आहेत. हे प्रामुख्याने उच्च उंचीच्या भागात तैनात करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. यामुळेच या स्वदेशी लढाऊ विमानांचा वापर सीमेवर अशा ठिकाणीही केला जाणार आहे, जिथे लढाऊ विमाने वापरता येत नाहीत.
सीमेवर शत्रूचा नायनाटएलसीएच ‘अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर’ ध्रुवशी साम्य असल्याचे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यात अनेक ‘स्टेल्थ’ (रडार चोरी) वैशिष्ट्ये, आर्मर्ड सुरक्षा यंत्रणा, रात्रीचा हल्ला आणि आपत्कालीन लँडिंग क्षमता आहे. याच वैशिष्ट्यासह हे अत्याधुनिक विमान रात्रीच्या अंधारात शत्रूचा नकळत खात्मा करण्यात पटाईत आहे. Indian Air Force अधिकार्यांनी सांगितले की 5.8 टन दुहेरी-इंजिन असलेल्या लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टरने विविध शस्त्रास्त्रांवरून गोळीबाराच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत. मार्चच्या सुरुवातीला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने (CCS) 3,887 कोटी रुपयांच्या 15 स्वदेशी विकसित मर्यादित मालिका उत्पादन (LSP) LCH च्या खरेदीला मान्यता दिली होती. यातील 10 हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलासाठी आणि पाच भारतीय लष्करासाठी असतील अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.