मुलीच्या धमकीला घाबरुन मुलाची आत्महत्या

0

पुणे : सेक्सटॉर्शन मुळे पुण्यातील धनकवडी येथील एका तरूणाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. अमोल गायकवाड असं या तरूणाचं नाव असून त्याला एका मुलीकडून नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी येत होती. त्याने पैसे पाठवूनही सतत मेसेज येत असल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल गायकवाड या तरूणाला एक तरूणी सतत मेसेज करून त्याचे नग्न व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होती. त्यानंतर अमोलने तिच्या अकाऊंटवर साडेचार हजार रूपये पाठवले. त्यानंतरही तिने जास्तीच्या पैशाची मागणी केली होती.

तिने केलेल्या मेसेजनंतर अमोलने “मै सुसाईड करूंगा” असा परत मसेज तिला केला. त्यानंतरही तिने पैशाची मागणी केली आणि “करो सुसाईड” असा रिप्लाय केला. याच जाचाला कंटाळून त्याने घरात साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या व्हॉट्सअप नंबरवरून गुन्हा दाखल केला आहे. तर मुलीचा शोध लागला नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सेक्शटॉर्शनचा प्रकार सध्या वाढला असून यापासून सावधगिरी बाळगणे महत्त्वाचं आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.