धक्कादायक…खूनाचा बदला घेण्यासाठी तरुणाचा खून

धक्कादायक...खूनाचा बदला घेण्यासाठी तरुणाचा खून

0

पिंपरी : मित्राच्या खूनाचा बदला म्हणून चाकण येथे तरुणाचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. चाकण पोलिसांनी त्यातील मुख्य आरोपी व त्यांच्या सात अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.



प्रणव उर्फ पन्या संजय शिंदे, आनंद उर्फ आण्णा तांडव हनुमंत कोरमशेट्टी या मुख्य आरोपींना अटक केले असून त्यांच्या 15 ते 17 वर्ष वयोगटातील सात अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी मयत युसुफ अर्शद काकर (18) याचा भाऊ साजीद अर्शद काकर (21 रा.चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रणव व त्याच्या साथीदारांचा मित्र रोहीत याचा 2021 साली खून झाला होता. त्या खूनात मयत युसुफ हा आरोपी होता. त्याचाच बदला म्हणून नियोजनबद्ध कट रचून सोमवारी (दि.10) रात्री दबा धरून बसलेल्या आरोपींनी रस्त्यात युसुफला गाठून त्याच्या डोळ्यात चटणी टाकली व कोयत्याने वार करत निर्घृण खून केला. चाकण पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.