पुणे : माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आज (बुधवार) दुपारी दोनच्या सुमारास विनायक निम्हण यांना हृदय विकाराचा झटका आला. यामध्ये त्यांचे निधन झाले.
पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघातून 1999 साली ते आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेना विभाग प्रमुख, आमदार, पुणे शहर प्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. विनायक निम्हण यांनी दोन वेळा शिवसेनेकडून आणि 2009 मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते.
माजी मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्या सोबत काही शिवसेना नेते आणि कार्यकर्ते गेले होते, त्यांच्यात निम्हण यांचा समावेश होता. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करुन शिवबंधन बांधले होते. यावेळी त्यांची शिवसेनेच्या शहर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती.