प्रियशीच्या पतीचा प्रियकराने काढला काटा

0

पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केला. तब्बल नऊ महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, वडगाव निंबाळकर येथील वैभव विठ्ठल यादव (वय 31) हा व्यक्ती बेपत्ता होता. या प्रकरणी त्याची पत्नी वृषाली वैभव यादव (वय 23) यांनी वालचंद नगर पोलीस ठाण्यात फिर्यादी होती. 19 फेब्रुवारी 2022 रोजी तो बेपत्ता झाला होता.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना, संबंधित व्यक्ती सोबत घातपात झाला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. वृषाली यादव वडगाव निंबाळकर येथील रोहित दत्तात्रय खोमणे यांच्यासोबत अनैतिक संबंध असून तिनेच प्रियकरणाच्या मदतीने पतीचा खून केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वडगाव निंबाळकर परिसरात सापळा रचून रोहित दत्तात्रय खोमणे, वृषाली वैभवी यादव, शिवदत्त उर्फ दादा श्रीधर सूर्यवंशी आणि सागर सर्जेराव चव्हाण या चौघांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी खून केल्याची कबुली दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.