पुणे : पुण्यातील मार्कटयार्ड परिसरात मास्क लावून आलेल्या पाच ते सहा आराेपींनी गाेळीबार करत व्यापाऱ्यांची 28 लाख रुपयांची राेकड जबरदस्तीने पळवून नेल्याचा प्रकार शनिवारी दुपारी घडला आहे. अंगडिया ऑफिसमधून सदर आराेपींनी संबंधित राेकड पळवून नेताना त्यांच्या जवळील पिस्टलमधून एक राऊंड फायर केल्याने खळबळ उडाली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच, मार्केटयार्ड पाेलिस घटनास्थळी दाखल झाले असून पाेलिसांनी आराेपींचा शाेध सुरू केला आहे.