पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 मे 2022 रोजी चाकण येथे घडला आहे.
याबाबत 26 वर्षीय तरुणीने चाकण पोलिसांकडे सोमवारी (दि.14) तक्रार केली आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी सतिश सुधाकर मुंडणकर (रा. म्हाळुगे, ता. मुळशी) याच्यावर आयपीसी 376 (2) (एन) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादी यांना भेटायला बोलावून घेतले. फिर्यादीकडे शरीर संबंधाची मागणी केली असता तरुणीने विरोध केला. आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेंडकर करीत आहेत.