पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मसाज करायचा बहाणा करुन मामीने स्वतःच्या अल्पवयीन भाच्याशी ‘लगट’ करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मामीवर पोक्सो अंतर्गत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 18 ऑक्टोबर रोजी येथे घडला.
याप्रकरणी अल्पवयीन भाच्च्याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित फिर्यादी यांना पायाला तेल लावण्याच्या बहाण्याने बोलावून पीडित मुलाशी गैरवर्तन करत, पीडीत मुलाला बॅड टच करत मनास लज्जा उत्पन्न केली. तसेच नकार दिल्यास मामाला खोट सांगण्याची धमकी दिली. प्रकरणी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.