दुहेरी खून प्रकरणातील आरोपी गजाआड

0

पुणे : येरवडा येथील लमाण वस्तीत झालेल्या दुहेरी खून प्रकरणात नऊ आरोपी व एका अल्पवयीन मुलाला येरवडा पोलिसांनी मंगळवारी (दि.15) ताब्यात घेतले आहे.

शंकर मानु चव्हाण (54), बादल शंकर चव्हाण (25), शिवशंकर अंजनकुमार हरगुडे (20),साहिल राम कांबळे (20),कृष्णा राजू पवार (23), निशांत तायाप्पा चलवादी (20), रोहित परशुराम सणके (21), गौरव उर्फ साहिल रवी चव्हाण (20), सोनू शंकर राठोड (23) व एक अल्पवयीन मुलगा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणातून अनिल उर्फ पोपट भीमराव वालेकर (35) आणि सुभाष उर्फ पापा किसन राठोड (41) या दोघांचा आरोपींनी तलवार व पालघन यांनी वार करत निर्घृण खून केला होता. मयत हे देखील सराईत गुन्हेगार होते.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत शंकर व त्याचा मुलगा बादल यांना पहिल्यांदा ताब्यात घेतले व इतर आरोपींना पुन्हा अटक केले. पोलीस तपासात आरोपींनी गुन्हा कबूल केला असून ते सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. पुढील तपास येरवडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.