भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना राजीव गांधी यांच्याकडे पाठवले जाईल

धमकीचे पत्र, नोव्हेंबरच्या शेवटी इंदोरमध्ये जागोजागी स्फोट होतील

0

नवी दिल्ली : इंदूर स्थित एका दुकानात सनसनाटी पत्र आढळले आहे. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खालसा महाविद्यालयात होणाऱ्या सभेत हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच संपूर्ण इंदूर शहरातही स्फोट घडवण्याचा इशारा देण्यात आला आहे. लिफाफ्यावर पत्र पाठवणाऱ्याच्या जागी रतलामचे भाजप आमदार चेतन कश्यप यांचे नाव लिहिण्यात आले आहे.

पोलिस या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 23 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात प्रवेश करत आहे. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी त्यांची इंदूरमध्ये सभा होईल.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 23 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात पोहोचणार आहे. तेथून ती उज्जैन व इंदूरमार्गे राजस्थानात जाईल. त्यातच आता राहुल यांची बॉम्बस्फोटाद्वारे हत्या करण्याची धमकी देण्यात आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. हे पत्र इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात आढळले. पोलिसांनी हे पत्र जप्त करून तपास सुरू केला आहे. दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासले जात आहे.

पत्रात सर्वात वर वाहेगुरु लिहिले आहे. त्याखाली लिहिले आहे… 1984 साली संपूर्ण देशात भयंकर दंगली झाल्या. शिखांची हत्या करण्यात आली. कोणत्याही पक्षाने या अत्याचाराविरोधात आवाज उंचावला नाही. (त्यानंतर येथे काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द आहेत.)

पत्रात पुढे लिहिले आहे की, नोव्हेंबरच्या शेवटी इंदूरमध्ये जागोजागी भयावह स्फोट होतील. बॉम्बस्फोटांनी संपूर्ण शहर उद्ध्वस्त होईल. राहुल गांधींच्या यात्रेत कमलनाथ यांनाही गोळ्या घातल्या जातील. राहुल गांधींनाही राजीव गांधींकडे पाठवले जाईल.

अन्य एका पानावर लिहिले आहे… नोव्हेंबर 2022 च्या शेवटच्या आठवड्यात इंदूर स्फोटांनी हादरेल. राजबाडाला विशेष लक्ष्य केले जाईल. पत्रात सर्वात खाली कुणीतरी ज्ञानसिंग यांचे नाव आहे. तसेच लेटरमध्ये अनेक मोबाइल क्रमांकही नमूद आहेत. पत्रासोबत एका आधार कार्डाची फोटोकॉपीही पाठवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.