चाकण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हातभट्टीवर कारवाई; 23.75 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट

0

पिंपरी : पिंपरी चिंचवड पुणे शाखा युनिट तीनच्या कामगिरीमध्ये चाकण महाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैधरित्या चालणारे गावठी हातभट्टीवर कारवाई करून एकूण 23.75 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.

18 नोव्हेंबर 2022 रोजी चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी पोलीस नाईक भोसुरे, पोलीस शिपाई सुर्यवंशी, पोलीस शिपाई हनमंते यांना अवैध धंद्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने या पथकाने सेल पिंपळगावच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळेस हनमंते यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून भीमा नदीच्या कडेला आरोपी बिरबल राठोड, रा. शेळपिंपळगाव, तालुका खेड, जिल्हा पुणे यांनी 2.5 लाख रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची तयार दारूची भट्टी लावली असताना सापडली.

पोलिसांची चावू लागतात ते पळून गेले होते तरी या ठिकाणी पथकास गावठी हातभट्टीचे दोन लोखंडी 2000 लिटरचे व एक प्लास्टिकचा हजार लिटरचा ड्रम असे एकूण पाच हजार लिटर कच्चे रसायन किंमत रुपये 2.5 लाख चा माल मिळाला होता. तो जेसीबी चे साह्याने जागीच नष्ट करण्यात आला व त्याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच 19 नोव्हेंबर रोजी माळुंगे चौकीच्या हद्दीत पोलीस हवालदार आढारी, पोलीस शिपाई हनुमंते पोलीस शिपाई दांगट, पोलीस शिपाई सूर्यवंशी हे पेट्रोलिंग करत असताना मौजे निघोजे गाव येथे आले असताना पोलीस शिपाई सूर्यवंशी व पोलीस शिपाई दांगट यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाल्याने त्यांनी नियोजन नियोजन गावाच्या हद्दीत सुभाष वाडी, काळोखे यांच्या मालकीच्या माळरानावर जाऊन पाहणी केली व बातमीची खात्री केली. बातमीची खात्री होताच अचानकपणे दुपारी 1.30 वा छापला टाकला असता पंचायत समक्ष त्या ठिकाणी पाहणी करताना कच्चे रसायन साठवून गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याकरिता जमिनीमध्ये पाच बॅरल त्यापैकी पाच हजार लिटरचे तीन व 2,500 लिटरचे 2 गुणाकार बकऱ्याचे ड्रम व त्यामध्ये कच्चे रसायन जमिनीमध्ये पुरल्याचे आढळून आले.

तसेच 100 मीटर अंतरावर काळोखे यांच्या मालकीच्या मनावर तीन बॅरेल 7,500 लिटरचे गोलाकार पत्राचे ड्रम मिळाले. भट्टी मालकाचे नाव गणेश मन्नावत (रा. निघोजे, तालुका खेड, जिल्हा पुणे) असे आहे.

त्या ठिकाणी 21.25 लाख रुपये किमतीचे एकूण आठ बॅरल त्यापैकी पाच हजार लिटरचे तीन व अडीच हजार दोन व साडेसात हजार लिटरचे तीन गोलाकार पत्राचे एकूण 42,500 लिटर गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन असा प्रतिबंधित माल मिळून आल्याने यो माल जेसीबी मशीनच्या सहाय्याने जागीच नाश करून माळुंगे चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.