भूमकर चौक ते नवले ब्रिज लगत असलेली अतिक्रमण हटवले

0

पुणे : पुण्यातील नवले ब्रिजवर झालेल्या भीषण अपघातानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाकडून महामार्गालगत असलेले अतिक्रमण हटवण्यात येत आहे. मंगळवारी (दि.22) भुमकर चौक ते नवले ब्रिज दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या बाजूच्या सर्विस रोडवर नॅशनल हायवे क्रमांक 04 च्या अंतर्गत अतिक्रमण कारवाई करण्यात आली. ही कारवाई सकाळी साडे आठ ते रात्री साडे सात या कालावधी पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. त्यामध्ये 16 आस्थापना समोरील भाग, 12 अर्धवट आस्थापना, 07 पान टपऱ्या यांचा समावेश आहे.

भूमकर चौकात करण्यात आलेल्या कारवाईत नॅशनल हायवे नंबर 4 चे अधिकारी, रिलायन्स कंपनीचे इंजिनिअर, रोड पेट्रोलिंगचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह 05 जेसीबी त्यामध्ये एक ब्रेकर, 01 पोकलेन, 05 डंपर, 05 गॅस कटर मशीन, 50 कर्मचारी, 02 हायड्रा, 01 ॲम्बुलन्स यांच्या साह्याने अतिक्रमण कारवाई करण्यात आली.

तसेच एक सहायक पोलीस आयुक्त, 4 पोलीस निरीक्षक, 18 सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक व 80 अंमलदार, मुख्यालयकडील 60 अंमलदार, वाहतूक शाखेतील 20 अंमलदार असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही कारवाई शांततेत पार पडली.

Leave A Reply

Your email address will not be published.