पुणे : दाखल असलेल्या तक्रार अर्जावरून कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या पुणे पोलीस दलातील एका पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सायंकाळी ही कारवाई केली. स्वराज पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात ते सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सहाय्यक निरीक्षक पाटील हे कोंढवा पोलीस ठाण्यात नेमणूकीस होते. यादरम्यान, तक्ररादार यांच्या पत्नी व सासऱ्यांविरोधात जागेच्या व प्लॅटच्या वादासंदंर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार आली होती. त्याची चौकशी पाटील यांच्याकडे होती. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडे पाटील यांनी कारवाई न करण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली. त्यात लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, लाच मागणीचा गुन्हा नोंद केला आहे.