ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

0

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे  निधन झाले. आज पहाटे सहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्‍यांनी आज (दि. २६) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील सर्वच कलाकारांकडून हळहळ व्यक्‍त केली जात आहे.

पीटीआयच्या वृत्‍तानुसार, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर गेल्‍या 15 दिवसांपासून उपचार सुरु होते. बुधवारी त्‍यांची प्रकृती खालावली होती. यानंतर काल (दि.२३) रात्रीपासून त्यांच्या निधनाचे वृत्त व्हायरल होतं होते. पण ती एक अफवा होती. सोशल मीडियावर विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचे मेसेज आणि फोटो व्हायरलं होतं होते. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावरुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती.

विक्रम गोखले यांनी हिंदी-मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने एक खास चाहता वर्ग निर्माण केला हेता. त्यांच्या आवाजातील कठोरपणा ही त्यांच्या अभिनयाची एक खासियत होती. विक्रम गोखले यांच्या डोळ्यांतून त्यांचा अभिनय आणि व्यक्तीरेखा व्यक्त व्हायच्या. त्यांचा अभिनय करताना डोळे किती बोलके असायला हवे, याचा मोठा अभ्यास त्यांना होता. विक्रम गोखले यांनी मराठी-हिंदी चित्रपटात अभिनय केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.