भोसरीत शाळकरी मुलीचा विनयभंग

0

पिंपरी : शाळेत जाणाऱ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील बोलून तिचा विनयभंग केल्याची घटना भोसरी मध्ये घडली आहे. हा प्रकार गणेशनगर येथील बसस्टॉप जवळ सोमवारी (दि.28) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 33 वर्षाच्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

दिनेशकुमार साधुराम (33 रा. गवळी माथा, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने (35) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी 354, 354 (अ), पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शाळेत जाण्यासाठी गणेशनगर येथील बसस्टॉप येथे आली होती.
त्यावेळी आरोपी मुलीचा पाठलाग करत बसस्टॉपवर आला. त्याने मुलीसोबत अश्लील बोलून तिच्यासोबत गैरवर्तन केले.
मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.