पिंपरी : एटीएम फोडताना तीन चोरांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 1) मध्यरात्री सव्वा दोन वाजताच्या सुमारास म्हाळुंगे येथे घडली.
आदित्य भीमराव कांबळे (20, रा. पिंपळे गुरव), विशाल बंडू कारके (रा. चिखली), प्रथमेश प्रकाश जाधव (रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रशांत प्रभाकर आरवलकर (37, रा. हिंगणे खुर्द, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे येथे असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये तीन चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री सव्वा दोन वाजताच्या सुमारास प्रवेश केला. एटीएमच्या लॉबीमध्ये असलेल्या मशीनचे कॉस्मिक डोअर व चेस्ट डोअर चोरट्यांनी तोडले. दरम्यान याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी तिन्ही चोरट्यांना अटक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
हि कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदशनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, तपासी पथकाचे सहायक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.