दलालांशी हातमिळवणी पोलिसाला पडली चांगलीच महागात

0

मुंबई : मानवी तस्करी करणाऱ्या दलालांशी हातमिळवणी करून तब्बल 43 लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवण्यास मदत करणाऱ्या मुंबई पोलीस हवालदाराची हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. तसेच गुप्तचर विभागाचे दोन अधिकारीही या रॅकेटमध्ये सामील असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हवालदार संजय थोरात यांची 2017 मध्ये इमिग्रेशन आणि पासपोर्ट क्लिअरन्सची देखरेख करणाऱ्या विशेष शाखा II मध्ये नियुक्ती झाली होती. मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांशी हातमिळवणी करून किमान 43 लोकांना बनावट पासपोर्ट वापरून परदेशात पाठविले. त्यांच्यावर हे आरोप झाल्यानंतर पाच वर्षे त्यांची चौकशी झाली.

या चौकशीनंतर दोषी आढळल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले. आता, 25 नोव्हेंबर रोजी थोरात यांना कार्यमुक्तीचा आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, थोरात याने मानवी तस्करी करणाऱ्या दलालांशी हातमिळवणी केली होती. 2017 मध्ये बनावट आणि फसवणूक उघडकीस आल्यानंतर सहार पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तपासात गुप्तचर विभागाचे दोन अधिकारीही या प्रकरणात सहभागी असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.