पिंपरी : पिंपरी, भाटनगर, पत्राशेड परिसरात रिक्षातून आलेल्यानी हवेत गोळीबार केला आहे. आज मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भर रस्त्यात 100 मीटरच्या अंतरावर तीन ठिकाणी पिस्तूलातुन चार राउंड फायर केले.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भाटनगर, चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्राशेड येथे वर्दळीच्या ठिकाणी, भरदिवसा, रिक्षातून येऊन फायरिंग केल्याने पोलिसांची पळापळ झाली. स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज मिळवून तपास सुरु केलेला आहे.
घटनेची माहिती मिळताच खुद्द पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त विवेक पाटील, यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे. मात्र या घटनेमुळे शहरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.