सरकारचा मोठा निर्णय! फेरीवाले अन् हातगाडीवाल्यांनाही मिळणार रोजगार; या योजनांचा घेता येईल फायदा

0

नवी दिल्ली : भारतात फेरीवाले, टपरीधारक आणि हातगाडीवाल्यांची संख्या खूप आहे. कोरोनाच्या काळात हातावर पोट असणाऱ्या समाजातील या घटकांचे प्रचंड हाल झाले. रोजगाराचे साधन नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळही आली होती.

केंद्र आणि विविध राज्य सरकारांनी आता फेरीवाले, टपरीधारक अन् हातगाडीवाल्यांसाठी विविध योजना आणल्या आहेत. या माध्यमातून त्यांना रोजगाराचं साधन उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे. ‘आज तक हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे.

कोरोनाच्या काळात अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. यात फेरीवाले, टपरीधारक आणि हातगाडीवाल्यांची संख्या अधिक आहे. या लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आता केंद्र सरकारनं पुढाकार घेतला आहे. या साठी केंद्राने स्वनिधी योजनेअंतर्गत 50 हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत देण्याची तरतूद केली आहे.

14,000 फेरीवाले, टपरीधारक आणि हातगाडीवाल्यांना लाभ देण्यासाठी पीएम स्वनिधी योजना बनवली गेली आहे. या सर्वांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत फेरीवाले, टपरीधारक आणि हातगाडीवाल्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारच्या आठ योजनांचा लाभ दिला जाणार आहे. हरियाणा सरकारच्या वतीने दोन दिवसीय प्रशिक्षणही देण्यात येईल.

या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणाऱ्यांना दर दिवशी 388 रुपयांचा भत्ता सरकारकडून दिला जाणार आहे. लॉकडाउनमध्ये झालं होतं मोठं नुकसान पीएम स्वनिधी योजना जून 2020 मध्ये सुरू करण्यात आली होती. मार्च 2020 मध्ये कोरोना काळात लॉकडाऊन लागले असताना फेरीवाले, टपरीधारक आणि हातगाडीवाल्यांना त्यांचे काम बंद करावे लागले. या काळात त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले.

दीर्घ काळापर्यंत लॉकडाउन असल्याने अनेकांना रोजगार सुरू करता आला नाही. फेरीवाले, टपरीधारक आणि हातगाडीवाल्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्रीय शहर गृहनिर्माण विकास मंत्रालयाने एक जून 2020 रोजी पंतप्रधान स्वनिधी योजना सुरू केली. यात टपरीधारक, फेरीवाले यांना हमी नसेल तरी कर्ज देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून त्यांना 10 हजारांपासून 50 हजार रुपयांपर्यंतचं कर्ज देण्याचे निश्चित करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे कुठलीही हमी न घेता त्यांना कर्ज उपलब्ध येतं. कुटुंबीयांनाही आठ योजनांचा मिळतोय फायदा टपरीधारक, फेरीवाले आणि हातगाडीवाल्यांच्या कुटुंबीयांनाही सरकारी योजनेचा फायदा घेता येतो. केंद्र सरकारने कुटुंबीयांसाठी आठ योजना सुरू केल्या आहेत.

यात जननी सुरक्षा योजना, वन नेशन वन कार्ड, पीएम जनधन योजना, पीएम जीवनज्योती विमा योजना, पीएम सुरक्षा विमा योजना, पीएम श्रम योगी मानधन योजना, बीओसीडब्ल्यू मातृ वंदना योजना आदींचा समावेश आहे.

4277 लोकांना 10 हजारांचे कर्ज स्वनिधी योजनेचा फायदा देण्यासाठी 13,842 टपरीधारक, हातगाडीवाले, फेरीवाल्यांची निवड केली गेली. स्वनिधी योजनेअंतर्गत आतापर्यंत बँकेच्या माध्यमातून 4,277 लोकांना 10-10 हजार रुपयांचे कर्ज दिले गेले. शिवाय त्यांच्यासाठी पाच व सहा डिसेंबर रोजी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन केले आहे. यात महानगरपालिकेअंतर्गत येणारे टपरीधारक हातगाडीवाले आणि फेरीवाल्यांचा समावेश आहे. या शिबिरात सहभाग घेणाऱ्यांना दर दिवशी 388 रुपये तर दोन दिवसांसाठी 776 रुपये खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.